राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजय वने यांच्यासमोर पाचगणी कर भावनिक पाचगणीतील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी विजय वने यांनी नगराध्यक्ष पद लढवावे पाचगणी करांची विजय वनें यांच्याकडे मागणी



राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजय वने यांच्यासमोर पाचगणी कर भावनिक पाचगणीतील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी विजय वने यांनी नगराध्यक्ष पद लढवावे पाचगणी करांची विजय वनें यांच्याकडे मागणी

पाचगणी प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून पाचगणी विकास आराखड्यातील वंचित असणाऱ्या पाचगणी शहरातील मोठमोठे वार्ड ज्यातील नगरसेवक मोठ्या थाटात प्रचंड बहुमतानी निवडून तर येतात मात्र निवडून आल्यानंतर तिथे असणाऱ्या मतदाराला वंचित केल्याशिवाय सोडत नाहीत याचे प्रतिपादन आता झाले असून व लोकांना आपली चूक कळाली असून लवकरच येऊन ठेपलेल्या पंचवार्षिक पाचगणी नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त घटना अभ्यासक कायदा अभ्यासक विजय शंकर वने यांनी पाचगणी करांचे नेतृत्व करावे अशी चर्चा आता संपूर्ण शहरातील मतदारांकडून ‌ चालू झालेली दिसून येत आहे, ६० ते ७० वर्ष झाले तरीदेखील अनुसूचित जातीला आपल्या हक्काच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा लाभ घेता आलेला नसून व अनेक वर्षांपासून वारंवार जे नगरसेवक निवडून आले त्यांनी केवळ आपलं घर आणि आपली प्रतिष्ठा आर्थिक भरभराटीचे काम केले असून तिथे असणाऱ्या वंचित मतदाराला आणखी वंचित करण्याचे काम झाल्याचे दिसून येत आहे, या व्यथा मतदारांनी विजय वनें यांच्यापाशी मांडल्या असून येत्या काळामध्ये जनतेतून नगराध्यक्ष पद पडल्यास त्या पदाचा लाभ आपण घ्यावा आणि पाचगणीतील रखडलेला विकास कामांसह बहुजन ‌समाजाला त्यांच्या हक्कांना भक्कम करण्याचे काम कायदा अभ्यासक विजय शंकर वनें यांच्या माध्यमातून व्हावे अशी इच्छा पाचगणी करांकडून व्यक्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तरुणांच्या हातामध्ये पेन नाही मात्र तरुणांच्या हातामध्ये झाडू आहे, आणि हा झाडू तुम्हाला जर का डिजिटल इंडियाच्या वाहत्या पाण्यासोबत हटवायचा असेल आणि हातामध्ये पेन घ्यायचा असेल डोक्यामध्ये संविधान ठेवायच असेल कायदा सक्षमीकरण करायचा असेल अन्यायाला वाचा फोडायची असेल तर केवळ आणि केवळ विजय वनें यांनीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाचगणी करांचे नेतृत्व करावे तर आणि तरच या शहराचा विकास निश्चित आहे असे पाचगणी करांकडून सांगण्यात येत आहे विजय वनें नगराध्यक्ष पद लढवणार का? असा प्रश्न आता उपस्थित झालेला पाचगणी शहरांमध्ये दिसून येत आहे,