दिं २६/५/२०२३, रोजीच्या मी रक्षा मंत्रालयाकडे केलेल्या पॉराग्लायडिंग च्या तक्रारींच्या अनुषंगाने दहशतवादी पॅराग्लायडिंग च्या साह्याने महाबळेश्वर पाचगणीच्या जंगलात मोठा कट तर शिजवत नव्हते ना? पर्यटन विभागाकडे पैशाकरिता फ्लाईंग करणाऱ्यां चालकांची माहिती उपलब्ध परंतु कुणी कुणी फ्लाईंग केली याची माहितीच नाही, अनमोल कांबळे



दिं २६/५/२०२३, रोजीच्या मी रक्षा मंत्रालयाकडे केलेल्या पॉराग्लायडिंग च्या तक्रारींच्या अनुषंगाने दहशतवादी पॅराग्लायडिंग च्या साह्याने महाबळेश्वर पाचगणीच्या जंगलात मोठा कट तर शिजवत नव्हते ना? पर्यटन विभागाकडे पैशाकरिता फ्लाईंग करणाऱ्यां चालकांची माहिती उपलब्ध परंतु कुणी कुणी फ्लाईंग केली याची माहितीच नाही, अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी

अल सफा दहशतवादी संघटनेच्या पकडलेल्या दहशतवादी आरोपींनी सातारा कोल्हापूर या ठिकाणी बॉम्बस्फोटकांची चाचणी केली असे एटीएस ने काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये सादर केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते बॉम्बस्फोटकांची चाचणी जर का कोल्हापूर सातारा च्या जंगलांमध्ये आरोपींनी केली असल्यास ती महाबळेश्वरच्या जंगलांमध्ये केली का? याची देखील तपासणी एटीएसने केली पाहिजे महाबळेश्वर येथील मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ येथे बेकायदेशीर रित्या पर्यटन संचालनालयाचे सहा. संचालक रवींद्र पवार यांनी ज्या प्रकारे शासनाच्या नियमांचा भंग करून पॉराग्लायडीग व्यवसाय करण्याकरिता परवानगी दिली होती व त्या अनुषंगाने पर्यटन संचालनालयामध्ये वारंवार तक्रारी देखील चालू होत्या व त्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटन संचालनालयाने अखेर रवींद्र पवार यांच्याकडून सर्व अधिकार काढून घेत पुणे पर्यटन विभागाच्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर यांच्याकडे इथून पुढे परवानगी द्यायचे की नाही हे अधिकार सोपवले आहेत, व असे असताना दिनांक २६/५/२०२३, रोजीच्या मी केलेल्या रक्षा मंत्रालयाकडे तक्रारीच्या अनुषंगाने खरोखर त्यावेळेस त्या तक्रारीच्या अनुषंगाने दहशतवाद्यांचे हस्तक हॉरिसन फॉली थापा पॉइंट या ठिकाणी आले होते का? त्यांनी हवेमध्ये फ्लाईंग करून पाचगणी महाबळेश्वरचा सर्वे केला का? याची चौकशी एटीएस ने केली पाहिजे मला मिळालेल्या माहितीनुसार पर्यटन विभाग पुणे यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना पैशाकरिता फ्लाईंग करणार्या सात ग्लायडर लोकांची माहिती उपलब्ध आहे, परंतु किती लोकांना फ्लाईंग केली याची माहिती पर्यटन विभागाकडे उपलब्ध नाही, मग त्यामध्ये राज्यात घातपाताचा सर्वात मोठा कट शिजवणारे दहशतवादी होते का? याचा देखील तपास एटीएस ने केला पाहिजे. तपासामध्ये जर का दहशतवादी या ठिकाणी आले होते असे जर का स्पष्ट झाले ? तर पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षकांकडे बेकायदेशीर पॉराग्लायडिंग संदर्भात तक्रारी करून देखील पोलीस निरीक्षक गप्प का होते? एटीएस पोलीस निरीक्षकांसह सदर कंपनीची चौकशी करून कंपनीला आरोपी करणार का ? पर्यटन संचालनालयाचे सहा संचालक रवींद्र पवार यांनी ज्या प्रकारे बिना परवाना अधिकाराचा भंग होत असताना देखील परवांनग्या दिल्या त्या पर्यटन संचालनालयाच्या सहा संचालक रवींद्र पवार यांना देखील आरोपी करणार का? व या अनुषंगाने आपण लवकरच आता एटीएसच्या कार्यालयामध्ये जाऊन पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले,