महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे,



महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे,

सातारा प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुका हा इको- सेन्सिटिव्ह झोन असून या तालुक्यांमध्ये अनेक बाहेरून येणाऱ्या धनदांडग्यांना स्थानिक दलाल दोन-तीन टाक्यांसाठी आश्रय देत असल्याने मोठ्या प्रमाणात बांधकामांच्या नावाखाली कट मारत आहेत परंतु ज्या प्रशासनाच्या अखत्यारी मधला हा विषय आहे, तेच महाबळेश्वरचे महसूल प्रशासन दलालांच्या हाताशी हात मिळवत पुस्तकाचे गाव असणारे भिलार येथील कार्यरत असणाऱ्या पवार तलाठ्याला आपला अनाधिकृत बांधकामाच्या माध्यमातून मिळणाऱ्या काळ्या मायेचा पार्टनर बनवत सुरेश पवार सारख्या एजंटाला हाताशी धरत हे आनाधिकृत बांधकाम प्रांत साहेबांचे आहे, असे तक्रारदाराला तलाठी च सांगत असल्याने महसूल यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे तो महाबळेश्वरच्या इको सेन्सिटिव्ह झोनची हवा घालवणारा मस्तावलेला प्रांताधिकारी कोण हे भिलार येथील कार्यरत असणाऱ्या पवार तलाठी यांनी सांगावे आणि तात्काळ साताराच्या एबीपी माझाच्या पत्रकाराच्या भावाचे अनाधिकृत चार मजल्याचे बेकायदेशीर बांधकामाचे काम त्वरित पाडावे बांधकाम परवाना नियमबाह्य शेतघराच्या नावाखाली अटी घालून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करून घ्यायचा आणि बांधकाम परवानाच्या नावाखाली अनाधिकृत प्रचंड मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या करायच्या झाडे तोडायची आजपर्यंत जे पत्रकार अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवत होते त्यांचेच बंधू प्रचंड मोठ्या प्रमाणात पाचगणी मध्ये अंजुमन हायस्कूल च्या शेजारी प्रचंड मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम उभारत आहेत त्याच्यावरती तहसीलदार सर्कल तलाठी कारवाई करणार आहे का? हे महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांना स्पष्ट करावे अन्यथा आम्हाला प्रशासनाच्या दलाल यंत्रणे विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये गरिबाला एक न्याय आणि श्रीमंताला एक न्याय हे आम्ही कदाचित खपवून घेणार नाही.आदरणीय लोकप्रिय सन्माननीय मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे पण त्याची अंमलबजावणी पवार सारखे तलाठी करत नसून शेतकऱ्याच्या शेतावर नांगर फिरवण्याचे काम करत आहेत का?असे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.