प्रतिनिधी
अनमोल कांबळे
पाचगणी, आंब्रळ, खिंगर, राजपुरी, दांडेघर, गोडवली या ठिकाणच्या लोकांचे प्रमुख केंद्रबिंदू असलेले पाचगणीतील तलाठी कार्यालय हे अनेक वर्षापासून ओस पडले होते सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारी मध्ये येणारी ही मिळकत असून या मिळकतीच्या विकासाला मुहूर्त मिळत नव्हता व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहत नव्हते मात्र नवनिर्वाचित सर्कल मा.पारवे व गावकामगार तलाठी मा. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाची दशा पाहून स्वतःची युक्ती लढवत कार्यालयाचा उत्कृष्ट कायापालट केलेले चित्र पाहायला मिळत आहे ज्या कार्यालयाच्या चावडीच्या अवती- भवती देखील येण्याकरिता लोकांना घाण वाटायची त्या कार्यालयामध्ये लोक प्रचंड उत्साहाने आता यायला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, व याचेच अवचित्य साधून नूतनीकरणाचे उद्घाटन आज रोजी जिल्हाधिकारी मा. जितेंद्र दुडी उपजिल्हाधिकारी मा.गलांडे साहेब महाबळेश्वरच्या तहसीलदार मा. तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या सह सर्कल सर्व तलाठी त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त मा.सौरभ राव यांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित कार्यालयाचे उद्घाटन आज रोजी पाचगणी येथे संपन्न झाले असल्याने संपूर्ण शहरांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळाले, सदर कार्यक्रमास कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वत्र मा. सर्कल पारवे व मा. पाटील तलाठी याचे कौतुक होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

