अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने करत हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध



महाबळेश्वर प्रतिनिधी

नांदेड जिल्हा बोंडार हवेली गावामध्ये एक जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही अन्यात गावगुंडांन कडून या युवकाची हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर हत्ये चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रसह देशात उंमटू लागले त्याचेच प्रतीक म्हणून महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्षय भालेराव हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शासन करा अक्षय भालेराव खून खटला प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवा महाराष्ट्र मध्ये चाललेले दलित हत्याकांड थांबवा असे आंदोलकांनी निदर्शने करत आंदोलनाच्या माध्यमातून घोषणा देत आपला निषेध व्यक्त करत महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले, यावेळी अनमोल कांबळे उत्तम भालेराव दीपक कांबळे सनी ननवरे जॉन जोसेफ ऋषिकेश वायदंडे सुनंदा मोरे व इतरही तालुक्यातील पक्षांचे व संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,