मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये वादग्रस्त राजवाडा उध्वस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना आत्ता नवनिर्वाचित तहसीलदार माझ्या खिशात‌ म्हणत भिलार ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्यां घेतायत अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याच्या जागेवरती ताबा शेतकऱ्याला अश्रू अनावर…,



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

मौजे भिलार येथील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करत आपल्या पदाचा गैरवापर करत पर्यावरणाला हानी पोहोचवत डोंगरदऱ्या पोखरत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करत विहीर खोदत बेकायदेशीर राजवाडा उभा केला परंतु महसूल यंत्रणा संबंधित हा यंत्रणेतलाच भाग असल्याने व कुंपण शेत खात असल्याने मुग गिळून गप्प बसलेली दिसत होती, परंतु साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपला कणखणीत बाणा दाखवत मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/ मध्ये आपल्याच घरातली व्यक्ती ही भिलार ग्रामपंचायत सदस्य असून व आपण स्वतः माजी. मुंबई पोलीस उपयुक्त असल्याने आपलं कोण काय करणार आहे, हे ध्येय बाळगले होते मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या दणक्याने राजवाडा उध्वस्त करण्याचे आदेश निघाले आणि अचानक तत्कालीन तहसीलदार सुषमा चौधरी (पाटील) यांची महाबळेश्वर तालुक्यातून बदली झाली व हे सगळं घडत असताना परंतु टांगती तलवार आपल्या डोक्यावरती असताना अचानकपणे सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची देखील सातारा जिल्हाधिकारी पदावरून तडकाफडकी बदली झाल्याने जणू काही आता या मुंबई पोलीस उपायुक्तला रानच मोकळे गावले की काय ? आणि म्हणून आपल्या घरातीलच ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या महिलेला पुढे करून मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/ अ/ च्या शेजारील अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याची असणारी जागा राजवाड्या करिता एक वायर करण्याकरिता शेतकऱ्यांच्या जागेवरची ताबा घेण्याचे काम हे शनिवार रविवारचा दिवस गाठून मुंबई चे माजी पोलीस उपायुक्त यांनी चालू केले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, इतकच काय तर संबंधित पिडीत अशोक कांबळे योगेश कांबळे शेतकऱ्याला दमदाटी करत पोलीस स्टेशनला अथवा अधिकाऱ्याकडे गेला तर याद राखा पोलीस माझ्या खिशात आहेत तर अधिकारी माझ्या डोक्यात असतो मी जे ठरवतो तेच करतो असा दम देखील संबंधितांकडून दिल्याचे पीडित शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, अशाच प्रकारे दम हा मागच्या वेळेस अशोक भिलारे यांना देखील देऊन भयभीत करण्याचे काम याच मुंबई पोलीस उपायुक्तांच्या सन्माननीय पत्नीने केले होते एकीकडे आपल्या घरात असणारे ग्रामपंचायत सदस्यत्व तर दुसरीकडे आपल्या घरात असणारे अधिकारीत्व हे दोन्ही मिळाल्याने भूमिपुत्र शेतकऱ्यांना धमकवणे दमदाटी करणे अधिकाराचा व ग्रामपंचायत सदस्यत्व पदाचा धाक दाखवणे हे चित्र सध्या पुस्तकाचे गाव मांणले जाणाऱ्या भिलार गावांमध्ये पाहायला मिळत आहे, नवनिर्वाचित महाबळेश्वरच्या तहसीलदार राजवाडा सील करणार का? राजवाड्यामध्ये बेकायदेशीर विहीर खोदली म्हणून पंचनामा करुन दंड आकारणार का? स्थानिक शेतकऱ्याला न्याय देणार का ?, हे चित्र येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे,