पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांची पाट संचालनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे व प्रामाणिकतेचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व स्थानिक भूमिपुत्रांकडून कौतुक…



महाबळेश्वर प्रतिनिधी

पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांनी पाठ फिरवली असून पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांच्या मनमानी कारभाराचा व एकतर्फी निर्णयाचा या पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मनमानी कारभाराच्या माध्यमातून वाढीव मुदत वाढ देणे तक्रारदारांचे म्हणणे न ऐकणे‌ व एकतर्फी धोरण राबवणे याचाच फटका या फेस्टिवल ला बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे की काय? सुरुवातीपासूनच कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच या कार्यक्रमावरती महाबळेश्वर तालुक्याच्या भूमिपुत्रांनी आक्षेप घेतला होता व याचेच पडसाद म्हणून की काय ? महाबळेश्वर पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सीआरपीएफ दोन चारशे महिला कार्यरत असून केवळ दहा ते पंधरा बचत गटांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते इतकंच काय ज्या पंचायत समितीच्या नियोजनावरती हे बचत गट चालतात त्या पंचायत समितीचे BDO देखील या कार्यक्रमाला गैरहजर असून केवळ फॉर्मलिटी म्हणून की काय ?पंचायत समितीचे बचत गट नियोजन प्रमुख जगताप दिसल्याचे चित्र पाहायला मिळत होते पर्यटन संचालनालयाच्या कारभारावरती लोकांची नाराजी असून मुंबई मे तुम बेटे है लेकिन इधर हम बेटे हे म्हणत पर्यटन संचालनालयाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात विरोधकांनी आपले म्हणणे साध्य केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मात्र माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील‌ यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह वैशाली भिलारे यांनी देखील सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे कौतुक करून हा कार्यक्रम पुढच्या वेळेस आणखी सुंदर करू व तुमचं कार्य हे खरोखर योगदान देणारे कार्य आहे करमरकर यांच्यासारख्या अधिकारी शासनामध्ये कार्यरत आहे याचा शासनाला अभिमान पाहिजे अशा लोकांनी वरिष्ठ ठिकाणी असणे गरजेचे आहे असे म्हणत विविध पक्षांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक संचालक प्रदूषित कार्यालय पुणे सुप्रिया करमरकर यांच्यावरती मात्र कौतुकाचा वर्षाव केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते,