मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात



पाचगणी प्रतिनिधी

मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये घुसखोरी करून मुंबईच्या धनिकांनी जे अतिक्रमण उभारलेली आहेत ती प्रशासनाने त्वरित उध्वस्त करून टाकावीत अन्यथा आम्ही आमच्या जागेमधली अतिक्रमण स्वतःहून काढण्याकरिता आम्हाला लिखित परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार खरात यांनी केली असल्याने संपूर्ण गावासह शहरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे तुषार खरात जे बोलतात तेच करत असल्या ने त्यांची भूमिका आता या विषयांमध्ये रास्त ठरणार असल्याचे दिसून येत आहे, महाबळेश्वर पाचगणी इकोसिन्सिटीव्ह झोन असल्याकारणाने व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी महाबळेश्वर पाचगणी मधील अनाधिकृत बांधकामे थोडा असे आदेश दिले असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने आदेशाची अंमलबजावणी सर्वे नंबर 56/3, मध्ये करण्याचे पत्र आम्हाला द्या सर्वे नंबर 56/3, ही आमची वहिवाट करणारी जागा असून अनेक वर्षांपासून आम्ही इथं वहिवाट करत आहोत परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मी बाहेर असताना माझ्या जागेमध्ये मुंबईच्या भाई गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी तलाठी ग्रामसेवक व स्थानिक एजंट यांना हाताशी धरून आमच्या जागेमध्ये अतिक्रमण उभारले आहेत जर का हे अतिक्रमण येत्या काळामध्ये शासनाने उध्वस्त केले नाहीत तर आम्ही स्वतः उध्वस्त करू म्हणून कायदा हातात घेण्याच्या अगोदर आम्ही कायद्याचे पालन करणाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर ही बेकायदेशीर बांधकामे उध्वस्त करण्याचे झालेले आदेश प्रशासनाने अमलात आणावे अन्यथा प्रशासन अमलात आणणार नसल्यास आम्हाला पत्र द्यावीत आम्ही आमची बांधकामे स्वखर्चाने काढून घेण्याकरिता तयार आहोत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे सामाजिक कार्यकर्ते तुषार खरात यांनी सांगितले,