वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट

वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट

May 2, 2023 | महाबळेश्वर

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांचा दिं १/ मे रोजी चा वाढदिवस असंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढदिवसाच्या सुरुवातीपासूनच सकाळची सुरवात तालुक्यामध्ये खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये देशाच्या युवा पिढीला मुलांना विविध शालेय साहित्य वाटप करत १ मे महाराष्ट्र दिनाचे व कामगार दिनाचे औचित्य साधून शालेय मुलांना पहिला देश आणि नंतर आपण हा संदेश देऊन खाऊ वाटप करत विविध शालेय साहित्य वाटप करण्यात आले व पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचगणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रयत्नांना यश देत सिद्धार्थ नगर सारख्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे मा. खासदार श्रीनिवास पाटील व मा.आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याच प्रमाणे राजपुरी दांडेघर खिंगर राजपुरी या ठिकाणी देखील राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या माध्यमातून विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, व त्याच प्रमाणे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून खासदार आमदार, माजी नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य,चेरमन विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये राजेंद्र शेठ राजपुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यक्रम समाप्त करण्यात आला,

Categories: महाबळेश्वर

Related Posts

मैं सिधा मुंबई बात करता हु कौन कलेक्टर मेरा सब बात हो गया है तहसीलदार ऑफिस के साथ म्हणत मुंब्रातिल भाईची मौजे दांडेघर येथील शरदभंग जागेत भाईगिरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मात्र केराची टोपली, प्रचंड प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड

April 28, 2023

प्रतिनिधीअनमोल कांबळे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी महाबळेश्वर मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करत बेकायदेशीर बांधकामे जमीन दोस्त करा लाईट व…

मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात

May 4, 2023

पाचगणी प्रतिनिधी मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये घुसखोरी करून मुंबईच्या धनिकांनी जे अतिक्रमण उभारलेली आहेत ती प्रशासनाने त्वरित…