माझ्या पतीच्या नावे असणाऱ्या बेकायदेशीर राजवाड्याची बातमी तु फॉरवर्ड केल्यास तुझ्यावरती विनयभंगा सह ॲट्रॉसिटी दाखल करेन ‌आशोक भिलारे यांना धमकी पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायतील सदस्याचा अजब कारभार



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

राज्यामध्ये पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायत मध्ये जुना राग मनामध्ये भरून दिं १४/४/२०२३, रोजी अजब प्रकार घडला आहे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांच्या आदेशानंतर महाबळेश्वर तालुक्यातील खडबडून झोपलेली महसूल यंत्रणा ही जागी झाली असता मौजे भिलार येथे सर्वे नंबर 9/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करून माजी मुंबई पोलीस उपयुक्त यांनी भला मोठा राजवाडा उभारला आहे व या राजवाड्याची बातमी ही लढा महाराष्ट्रा चा या पोर्टलच्या माध्यमातून प्रसिद्ध होताच महसूल यंत्रणेने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजवाड्याचे नाव हे आपल्या अनाधिकृत बांधकामाच्या कारवाईच्या लिस्टमध्ये टाकले असल्याने व सदर मिळकती वरती कारवाई होत नसल्याने व वारंवार बातमी लागत असल्याने महाबळेश्वरच्या तहसीलदार या बांधकामावरती कारवाई करणार असल्याचे समजत असल्याने अशोक भिलारे हे काल दिनांक १४/४/२०२३ रोजी भिलार ग्रामपंचायत मध्ये गेले असता इकडे ये अशोक इकडे ये असे म्हणत ग्रामपंचायत मध्येच अनाधिकृत राजवाडा उभारणाऱ्या मुंबई पोलीस उपयुक्त यांच्या पत्नीने अशोक भिलारे तू आमच्या बेकायदेशीर राजवाड्याची बातमी फॉरवर्ड केली होतीस का खूप शाणा झाला आहेस का तुला माझ्या पतीची आणि आमची ताकद माहित नाही का कोण तहसीलदार कोण तलाठी आणि कोण हे तुझ्या पुढ्यामध्ये बसलेले पुढारी यांना मी भीत नाही भीक घालत नाही कारण मला जेव्हा भीक घालायची होती तेव्हा मी पहाटे 5 वाजता भिक घातली होती हे या तुझ्या समोर बसलेल्या पुढार्‍यांना विचार आणि तुला इतकी मस्ती आली आहे का की तू आता माझ्या बेकायदेशीर राजवाड्याची बातमी फॉरवर्ड करायला लागलेला आहेस इतके वर्ष माझा आणखी एक बेकायदेशीर बंगला हा कासवंड मध्ये आहे, त्याची तक्रार करणारा अजून जन्माला येणार आहे एका माझ्या राजवाड्याची तक्रार झाली म्हणून काय झालं कोण जिल्हाधिकारी कोण तहसीलदार तलाठ्याला माझ्याकडे नोटीस घेऊन पाठवते आणि विचार त्या तलाठ्याला मी त्याच्यासमोरच माझ्या अनाधिकृत राजवाड्याचे काम चालूच ठेवले होते पण त्याची हिंमत झाली नाही माझं काम बंद करायची हागे पुरावा ही माझी ताकद आहे, माझ्या पतीने मुंबईतल्या भल्या भल्या लोकांचे तक्रारदारांचे तोंड बंद केले आहेत, ही आमची ताकद आहे, पोलीस यंत्रणा आमच्या खिशामध्ये आहे, माझे पती हे मुंबई पोलीस उपायुक्त होते ‌ काही दिवसातच पोलिसांची ताकद काय असते हे त्या तक्रारदाराला सुद्धा कळेल पुन्हा जर का आमच्या वाटे गेलास तर तुझ्यावरती प्रथंमता ॲट्रॉसिटी दाखल करेल नंतर विनयभंग दाखल करेन आणि इथ लाईनीत बसलेल्या याच पुढार्‍यांना त्या केस मध्ये साक्षीदार बनवेन मी ज्या लोकांचे फोटो काढते त्या लोकांचे कार्यक्रम फिट करते विचार जाऊन पाचगणीतल्या त्या तक्रारदाराला दोन वर्षांपूर्वी मी त्याचा फोटो काढला होता असे सांगत अशोक भिलारे या शिवसैनिकाला थेट ग्रामपंचायती मध्येच दमदाटी करून संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला नंतर हा प्रकार जागेवरती बसलेल्या लोकांच्या लक्षामध्ये येताच अशोक भिलारे यांना तू घरी जा अन्यथा आता विषय वाढेल असे सांगून भयभीत झालेल्या अशोक भिलाऱ्याला घरी पाठवण्यात आले व हा प्रकार बाहेर कोणालाही सांगितल्यास याचे परिणाम तुला भोगावे लागतील असेही समजून सांगण्यात आले,. भयभीत झालेला अशोक भिलारे हा आज आमच्याशी संपर्क साधत त्याने त्याच्या व्यथा मांडल्या आता पोलीस यंत्रणा समक्ष जागेवरती जाऊन पीडित अशोक भिलारे याचा जबाब घेऊन पोलिसांच्या नावावरती दहशत माजवणाऱ्याला व गाडीला पोलीस नावाची पाटी लावून फिरणाऱ्या संबंधितांवरती कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य गावकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेला आहे..