आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…



प्रतिनिधी पाचगणी…
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड ता.-महाबळेश्वर येथील कासवंड गावातील सर्व्हे नंबर 22/1 मध्ये दोन व्यक्तीचा वयक्तिक स्वरूपाचा वाद आहे परंतु आज त्यांनी त्यांचा वाद हा कायदेशीर मिटवला पाहिजे मात्र आज सकाळी परस्पर दोन्ही मिळकत धारक यांनी बेकायदेशीर जमाव जमवत दिडशे- दोनशे बाहेरचे अनोळखी इसम गावात घेऊन येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी विचारपूस केली असता अरेरावीची भाषा रात्री बेरात्री गोंधळ घालत आहेत सदरचा प्रकार निदर्शनास येताच पाचगणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तणाव निवळला. ग्रामपंचायत कासवंड चे सरपंच श्री जनार्दन चोरमले सदस्य श्री निलेश गोळे ग्रामसेवक विजय राजपुरे. श्री आनंद पवार तंटामुक्ती अध्यक्ष. पांडुरंग पवार श्री संजय धामुनसे कांचन पवार श्री सुनील पवार श्रीआशिष पवार श्री दत्तात्रय पवार यांच्यासह सर्वांनी पाचगणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन सदर प्रकार हा निंदनीय आहे आम्ही हे असले प्रकार गाव व ग्रामस्थ कधीही खपवून घेणार नाही गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढे या उद्योग व्यवसाय वाढवा परंतु अशा दहशतीला गाव भीक घालणार नाही इथून पुढे अशा घटना घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अशा मिळकतीचे ठराव घेऊन मिळकतीचे उतारे रद्द केले जातील ही नोंद घ्यावी असा सज्जड इशारा सरपंच श्री जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांनी दिला आहे….