पाचगणी प्रतिनिधी
आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलच धनदांडग्यांचे पवारांचे ट्रॅक्टर जेसीबी वापरून आपल्याच गावाचे माळीन बनवण्याचे काम करायचे आणि हे काम करत असताना त्यातील निघणारी संपूर्ण उत्खननाची बेकायदेशीर माती असेल कचरा असेल हा भारत स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक देशामध्ये पटकावणाऱ्या पाचगणी नगरपालिका हद्दीतील लाखो रुपयांची गटार बनवणाऱ्या गटर मुजवण्याच्या कामामध्ये आपले योगदान देण्याचे काम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंचांच्या माध्यमातून व गाव पुढाऱ्यांच्या माध्यमातून चालू कराच आणि म्हणून ही यंत्रणा भ्रष्ट आहे पारठे नावाचा ठेकेदार हा राजरोसपणे उत्खनन करत आहे ती संपूर्ण मातीही पाचगणी शहरांमध्ये आणून नगरपालिकेने बनवलेल्या गटांमध्ये फेकत आहे परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई या धनदांडग्यावरती प्रशासकीय महसूल यंत्रणे कडून होत असल्याचे चित्र दिसून येत नाहीये आणि म्हणून याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालय भोसे येथील ग्रामसेवक तलाठी सरपंच यांना जाग करण्याकरिता आणि स्वतःची घाण ही स्वतःच्याच गावामध्ये विल्हेवाट लावण्याचे प्रशिक्षण देण्याकरिता भोसे गाव ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवशीय माती फेक आंदोलन करण्याचे नियोजन हे आम्ही केलेलं आहे कारण या सुन्न झालेल्या यंत्रणेला आंदोलन केल्याशिवाय जाग येणार नाहीये याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या गावाच्या ग्रामपंचायतीच्या धोरणांच्या निषेधार्थ आम्ही ग्रामपंचायत कार्याल भोसे येथील माती फेक व निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून या वृत्तीचा निषेध केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तात्काळ सरपंचांनी तहसीलदार महाबळेश्वर पाचगणी पोलीस स्टेशन आरटीओ कार्यालय सातारा यांना पत्र दिले पाहिजे की गावामध्ये बेकायदेशीर बिना नंबर प्लेटचे फिरत असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त करा बिना नंबर प्लेट चे जेसीबी जप्त करा आणि या लँड माफियांना कठोरात कठोर शासन करा असे अनमोल कांबळे यांनी सांगितले.

