गाव विकल्याच्या खोट्या बनावात प्रत्यक्ष सहीशिक्यानिशी सहभाग दाखविल्या प्रकरणी संविधानिक जबाबदार पदावर असणाऱ्या व आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल मौजे दांडेघर गावच्या पोलीस पाटील यांची पूर्ण चौकशी करून त्यांचे तात्काळ निलंबन करून पदमुक्त करण्यात यावे…पूनम कांबळे(गोळे)
October 8, 2022 | महाबळेश्वर
पाचगणी प्रतिनिधी…
मौजे दांडेघर ता महाबळेश्वर येथील दांडेघर गावातील 110 ग्रामस्थ यांनी 25 सप्टेंबर पासून चालू केलेला गाव विकल्याचा बनाव अद्याप संपुष्टात येत नसल्याचे चित्र दिसत आहे कसलाही अधिकृत पुरावा नसताना दांडेघर ग्रामस्थांनी 25 सप्टेंबर रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात निवेदन दिले की पूनम कांबळे व इतर 3 अशा चार लोकांनी गाव विकला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मात्र गाव कामगार तलाठी यांनी अशी कोणतीही घटना घडली नाही व शासकीय रेकॉर्ड वर कोणतीच माहिती अद्याप तरी उपलब्ध नाही असे लेखी पत्र दिले तसेच पोलीस ठाण्यातही पूनम कांबळे सह सर्वांचे जबाब नोंदविले आहेत
जर यात काहीच तथ्य नाही तर हा गाव विकल्याचा आरोप का करण्यात आला हा संशोधनाचा विषय आहे मात्र या निवेदनात दांडेघर गावच्या पोलिस पाटील शासकीय प्रतिनिधी म्हणून जे गावातील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम बजावत असतात तेच रक्षक भक्षक होयला लागले आहेत आणि म्हणून पोलीस पाटील योगिता खरात या इतक्या गंभीर बनावात सहभागी झाल्याप्रकर्णी त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात यावे यावरून कळते त्या पदास पात्र नाहीत व त्या लोकशाहीस घातक काम करत आहेत त्यांच्या एका नाटकामुळे अज्ञाना मुळे बेजबाबदार हलगर्जीपणा मुळे घातपात दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो यापूर्वी ही मोर्चे आंदोलने असे प्रकार दबावतंत्राचा वापर आरोपींन कडून करण्यात आलेला आहे म्हणून यांना या पदावर कार्यरत राहण्याचा अधिकार नाही त्यांना पदमुक्त करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी उपविभाग वाई यांना पूनम कांबळे(गोळे) यांनी दिले आहे ....
Categories: महाबळेश्वर
Related Posts
गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली
October 3, 2022
पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका कार्यालया समोर दिनांक 3/10/2022 रोजी अनमोल कांबळे यांनी गाढव आंदोलनाचे नियोजन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश…
<em>मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार अनमोल कांबळे</em>
October 8, 2022
पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की…
