सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर हे गाव विकले आहे असे सांगून लोकांची माती भडकवणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून बदनामी करणाऱ्या गाव गुंडांन वरती चौकशी करून त्वरित कारवाई करा असे आदेश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज सातारा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत मौजे दांडेघर हे गाव संपूर्ण इनाम वर्ग 3/ चे असून या गावाला सारा माफी नाही गावचा संपूर्ण ताबा व वहिवाट ही सुहास लक्ष्मण वाकडे यांची असल्याचे शासकीय रेकॉर्डला बुक नंबर 5/ मध्ये नोंद असल्याचे व तसा 247 हेक्टर चा उतारा असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु असे असताना उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांनी सुहास लक्ष्मण वाकडे यांचे त्यांच्या सातबार्या वरती नाव लावा व इतर बेकायदेशीर देवस्थानच्या जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे रद्द करा असे आदेश देताच स्थानिक गाव गुंडांनी ॲट्रॉसिटीतील आरोपींनी आता आपली एजंट गिरी बंद झाली आहे या धास्तीने ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी गावामध्ये व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र दिसून येत आहे गावातील लोकांची माती भडकवणे पोलीस स्टेशनला गाव विकले आहे असे भासवून निवेदन देणे वृत्तपत्रांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणे ही परिस्थिती निर्माण होताच संपूर्ण तालुक्यामध्ये मौजे दांडेघर गाव हा चर्चेचा विषय ठरला होता परंतु दुपार होईपर्यंत संपूर्ण चित्र हे स्पष्ट झाले होते व गाव विकल्याच्या अफवा पसरले आहेत ही केवळ अफवाच आहे असे देखील लोकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. परंतु आता पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर स्थानिक पोलीस या आदेशाची अंमलबजावणी करतात की नाही? हे बघन फार महत्त्वाचे दिसून येत आहे व वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गावगुंडांवरती स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करणार का? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे ॲट्रॉसिटीतील आरोपींची जामीन रद्द करण्याकरिता स्थानिक पोलीस प्रशासन मेहरबान न्यायालयामध्ये प्रस्ताव पाठवणार का ? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे व लोकांच्या या प्रश्नाकडे नजरा लागून राहिलेल्या आहेत.

