महाबळेश्वर चे परवावज विशारद नामदेव सपकाळ महाराष्ट्र कला सन्मान पुरस्काराने सन्मानित.



प्रतिनिधी
अनमोल कांबळे

आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेकडून दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार 2022 हा मानाचा पुरस्कार गावढोशी ता महाबळेश्वर जि सातारा येथील परवावज वादक श्री नामदेव हरिबा सपकाळ यांना जाहीर झाला आहे.नुकतेच त्यांना ऐका कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे नामदेव सपकाळ यांनी त्यांच्या बालवयापासूनच भजन कलाक्षेत्रामध्ये आपल्या वाटचालीस सुरवात केली होती त्यांच्या घरामध्ये सर्वांना पहिल्यापासून भजनाची आवड होती. त्यांचे परवावज प्राथमिक शिक्षण त्यांचे काका सुप्रसिद्ध मृदुगचार्य कै. तुकाराम सपकाळ(बुवा) यांच्याकडे झाले त्यानंतर पुढील शिक्षण मुंबई येथे मृदुगाचार्य श्री शिवाजी बुधकर यांच्याकडे झाले व आता शास्त्रीय परवावज शिक्षण अलंकार श्री संदीप महाराज जाधव यांच्याकडे चालू आहे त्यांना भजन क्षेत्रात घडवणारे गावातील भजन सम्राट कै. आणाजी सपकाळ बुवा. कै. सुभाष सपकाळ. श्री रामचंद्र सपकाळ बुवा. व मृदुंगाचार्य श्री अंकुश बुवा सपकाळ यांनी केले, अलीकडच्या पंधरा वर्षात श्री कालभैरवनाथ पारंपरिक भाजन मंडळ गावढोशी यांनी अनेक डबलबारी भजने केली आहेत भजनी बुवा श्री संतोष सपकाळ बाबू सपकाळ हे आता चालवत आहेत नामदेव सपकाळ यांनी अनेक ठिकाणी विद्यार्थी घडविले आहेत म्हणूनच त्यांना हा आर्ट बिटस फाउंडेशन पुणे महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.