ॲड गुणरत्न सदावर्तेंनी घेतली जिल्ह्यातील मनमानी कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रारदारांकडून माहिती वेळ पडल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू अधिकाऱ्यांशी कौटुंबिक आर्थिक हितसंबंध असणाऱ्या लोकांच्याही सीबीआय चौकशीची न्यायालयाकडे करू मागणी ॲड सदावर्तेचे तक्रारदारांना आश्वासन.
August 20, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
ॲड गुणरत्न सदावर्तेंनी घेतली जिल्ह्यातील मनमानी कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रारदारांकडून माहिती वेळ पडल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू अधिकाऱ्यांशी कौटुंबिक आर्थिक हितसंबंध असणाऱ्या लोकांच्याही सीबीआय चौकशीची न्यायालयाकडे करू मागणी ॲड सदावर्तेचे तक्रारदारांना आश्वासन.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मनमानी कारभाराने चुकीच्या पद्धतीने आपले वर्चस्व कायम ठेवत एकतर्फी धोरण राबवणाऱ्या सातारा जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या चुकीच्या व आडमुटी धोरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर लघुउद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातारा जिल्ह्यातील वाईचे पशुसंवर्धन अधिकारी शिंदे वाईच्या तहसीलदार मिटकरी तसेच सातारचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या संदर्भात तक्रार केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथील बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले असल्याने याच पार्श्वभूमी वरती राज्याचे कायदेतज्ञ वकील ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी या विषयाची दखल घेत तक्रारदारांकडून संपूर्ण माहिती घेतली असल्याचे समजत आहे, मिळालेल्या माहितीनुसार सदावर्ते यांनी तक्रारदारांना सांगितले अधिकारी जर का भ्रष्ट असेल कायद्याचा आणि अधिकाराचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला शासन होणे गरजेचे आहे, त्या अनुषंगाने वेळ पडल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून बेहिशोभी काळी माया जमवणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या कौटुंबिक हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींची सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयाकडे करू असे ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी तक्रारदारांना सांगितले असल्याचे समजत आहे.
Categories: सातारा
Related Posts
पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप.!
August 16, 2026
पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा उत्साव.
ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश.!
August 23, 2026
जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत साताऱ्यात ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे…
