सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन  पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे  मागणी.!

सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मागणी.!

July 13, 2026 | महाराष्ट्र, सातारा

प्रतिनिधी सातारा

सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मागणी.

सातारा जिल्ह्यातील मागील एक दीड वर्षापासूनचा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचा कारभार पाहता एकतर्फी हुकूमशाहीच्या मार्गाने नागेश पाटील यांची भूमिका सुरू आहे, असा असणारा प्रश्न उपस्थितीत करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे जिल्हा महासचिव प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमोल चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आज जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे, निवेदनात म्हटले आहे की उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची सातारा जिल्ह्यातून तात्काळ हाकलपट्टी करा नागेश पाटील हे जिल्ह्यात एकतर्फी भूमिका राबवत असतात प्रशासनाने दिलेल्या अधिकारांचा हुकूमशाही मार्गाने आपल्या सोयीनुसार अंमलबजावणी करत असतात कार्यालयामध्ये वेदना घेऊन येणाऱ्या जिल्हावासी यांना हूसकवून लावणे पिढीतांना अपमानित करणे तक्रारदारांना केविन मधून हाकलून लावणे असे प्रकार नागेश पाटील करत असतात तर दुसरीकडे शेतीपूरक व्यवसायाच्या नावाखाली महाबळेश्वर तालुक्यामध्ये इकोसिन्सेटिव्ह झोन मध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यावधी रुपयांच्या जागेंना बांधकाम परवानगी येणे ऑर्डर नागेश पाटील यांनी दिली आहे व त्या माध्यमातून नागेश पाटील यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केल्या असल्याची चर्चा सर्वत्र आहे आणि म्हणून नागेश पाटील यांची सातारा जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी झाली पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान अंमलामध्ये आणून लोकशाही अंमलामध्ये आणली आणि जर काही लोकशाही अशा प्रकारे लोकशाही चालवणारे धोक्यात आणत असतील तर यांचं करायचं काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे, लोकांसाठी अंमलात आणलेली लोकशाही जर का तुम्ही दाबली तर तिचा विद्रोह होतो आणि जर का तिचा विद्रोह झाला तर विस्फोट होण्यासाठी वेळ लागणार नाही हे जिल्हाधिकारी यांनी लक्षात घ्यावे आणि तात्काळ नागेश पाटील यांच्या बदलीचा प्रस्ताव जिल्ह्यातून हकलपट्टीचा प्रस्ताव तयार करून तो तात्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठवावा त्याच प्रकारे नागेश पाटील यांनी शेतीपूरक व्यवसायाकरिता महाबळेश्वर तालुक्यामध्ये ज्या जमिनी येणे केल्या त्या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय सुरूच झाले नाहीत तिथे वेगळेच व्यवसाय चालू झाले मग जर का व्यवसाय सुरू झाले नाही तर जमिनी येणे कुठल्या नियमानुसार केल्या याचाच अर्थ यात फार मोठ्या प्रमाणात आर्थिक गौड बंगाल दडलेल आहे आणि म्हणून उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची खाते न्याय सखोल चौकशी होण्याकरिता नागेश पाटील यांच्या विरोधात या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तात्काळ प्रस्ताव तयार करून तो ईडी डिपार्टमेंट भारत सरकार व इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भारत सरकार जुनी इमारत पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट समोर मुंबई यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाठवावा प्रस्ताव पाठवल्यास आपल्या भागातील एका तिराईत व्यक्तीच्या नावावरती पुण्यातील एका तिराईत व्यक्तीच्या नावावरती त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरती असणाऱ्या मिळकतींची सखोल चौकशी होऊ शकते जर का ही चौकशी झाली तर फार मोठ गौड बंगाल यातून बाहेर येणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी लोकशाहीचा मान ठेवत जिल्हावासी यांच्या भावना लक्षात घेत तात्काळ नागेश पाटलांची या जिल्ह्यातून हकलपट्टी करण्याचा व बदली करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवावा ही मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची असून जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव येत्या आठ दिवसांमध्ये न पाठवल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने एक मोठे जन आंदोलन महसूलमंत्र्यांच्या मुंबईतील घरासमोर उभारले जाईल याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी असे अनमोल कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Categories: महाराष्ट्र, सातारा

Related Posts