मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था.!
June 28, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
मान्यवरांच्या उपस्थितीत एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचे संस्थेचे धोरण अनमोल कांबळे (उपाध्यक्ष) प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्था पांचगणी.
प्रेरणा जनकल्याण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप चार जुलै पासून केले जाणार असून यावर्षीचा संस्थेचा संकल्प एक हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोचवण्याचा असून तसेच दोन हजार वृक्षारोपण करण्याचा नवा अध्याय संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रेरणा जनकल्याण सामाजिक शैक्षणिक संस्थेचे (उपाध्यक्ष) अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे, अनमोल कांबळे म्हणाले संस्थेचे कार्य हे अत्यंत कौतुकास्पद असून गेल्या 11 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात संस्था कार्यरत असल्याने यावर्षी वृक्षारोपणाची सुरुवात ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राज्यमंत्री जयदीप कवाडे तसेच कायदेतज्ञ ॲड. डॉ गुनरत्न सदावर्ते यांच्या हस्ते वृक्षारोपण करून यावर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून देशातील एव्हरेस्ट शिखर सर करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील पहीले पोलीस अधिकारी शिवाजी ननावरे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून संस्थेच्या कार्यक्रमाची यावर्षीची सुरुवात होणार असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार… श्री निलेश गोकुळ गोळे यांची वाढदिवसानिमित्ताने घोषणा.!
June 27, 2026
प्रतिनिधी भिलार आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन…
पर्यटन संचालनालयाने महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उद्योजक तरुणांसाठी पर्यटन व्यासपीठ उभारावे त्याकरिता संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना लागेल ती मदत आम्ही करू वाढदिवसानिमित्त उद्योजक विकास पिसाळ यांनी सुचवला संचालनालयाला नवा संकल्प.!
July 1, 2026
प्रतिनिधी सातारा पर्यटन संचालनालयाने महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उद्योजक तरुणांसाठी पर्यटन व्यासपीठ उभारावे त्याकरिता संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी यांना लागेल ती…
