शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधानपरिषद द्या साताऱ्यातून कार्यकर्त्यांची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
April 16, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधानपरिषद द्या साताऱ्यातून कार्यकर्त्यांची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
महाराष्ट्रात येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना विधान परिषद द्या अशी मागणी सातारा जिल्ह्यातून जोर धरू लागली असून सातारा युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे म्हणाले सातारा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते घेऊन येत्या आठ दिवसांमध्ये मुंबईला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधान परिषदेवरती संधी द्या व जयदीप कवाडे यांच्या कार्याचा सन्मान करा अशा आशियाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे सातारा युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले अनमोल कांबळे म्हणाले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक लॉंग मार्च प्रणेते माजी आमदार खासदार जोगेंद्र कवाडे सर यांचे कार्य आंबेडकरी चळवळीतील प्रेरणादायी कार्य आहे त्याच प्रकारे भाई जयदीप कवाडे यांचे कार्य सुरू असून आंबेडकरी चळवळीला नवी दिशा देणारे कार्य आहे युवकांच्या मनामध्ये भाई जयदीप कवाडे यांचे असणारे स्थान व त्यांचा असणारा आदर्श हा दिवसेंदिवस राज्यभर वाढत चालला असून आंबेडकरवादी आंदोलनांमध्ये भाई जयदीप कवाडे सक्रिय असून राज्यातील अन्यायग्रस्त मोलमजूर शेतकरी हॉकर्स विद्यार्थी यांच्यासाठी भाई जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हक्काचा सुरू असलेला लढा राज्याला दिशा देणारा असून शिवसेना भाजपा या पक्षाशी आमच्या पक्षाची युती असून भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी मागणी करणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: सातारा
Related Posts
मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड सातार्यात 135 सहाव्या जयंतीची जोरदार तयारी.
April 13, 2026
प्रतिनिधी सातारा मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा…
दिनांक 23/4/2026 पासून तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कार्यालयाबाहेर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे.!
April 19, 2026
प्रतिनिधी पांचगणी दिनांक 23/4/2026 पासून तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कार्यालयाबाहेर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे. देशभर…
