मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता इतकंच नाही तर खोटे व बनावट किंग मेकर ठरणाऱ्यांला योग्य वेळी जागा दाखवू पुनम गोळे.



प्रतिनिधी पांचगणी 

मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता इतकंच नाही तर खोटे व बनावट किंग मेकर ठरणाऱ्यांला योग्य वेळी जागा दाखवू पुनम गोळे.

भिलार पंचायत समितीमध्ये भिलार गणामध्ये शिवसेनेचा जोर वाढला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ: पुनम निलेश गोळे यांनी प्रचारादरम्यान सांगितले मला राजकीय वारसा नाही व नाही मी कोणाचा हिरावून घेतला आहे, माझी लढाई ही सन्मानाची व स्वाभिमानाची आहे लाचारी आणि गुलामगिरीला आपल्या पायथड्यांने लाथाडून वर्चस्व निर्माण करणाऱ्या घराण्यातून मी येते त्यामुळे अनेक वर्षापासून भिलार गणाला लागलेली ही गुलामगिरी आणि लाचारी मी माझ्या पायाने तुडवणार आहे, खऱ्या राजकीय वारसांना आपल्या मर्जीने व हुकूमशाहीने डावलून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही पाचगणी सारख्या शहरांमध्ये कुठलाही संबंध नसताना नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वयंघोषित बनावट खोट्या पद्धतीचा किंगमेकर चा बुरखा काही पक्षपाती पत्रकारांना हाताशी घेऊन एका स्वयंघोषित राजकीय नेत्याने स्वतःच्या अंगावरती ओढून घेतला होता आणि रात्री नऊ वाजेपर्यंत रेस्ट हाऊसच्या परिसरात पैसे वाटत बसला होता त्याच राजकारण्याने आपल्याच राजकीय गुरूचा वारसा देखील स्वतःच्या स्वार्थासाठी ओढून घेतला आणि राजकीय गुरूच्या घराण्याला या निवडणुकीपासून लांब ठेवण्यात हा स्वयंघोषित बनावट किंगमेकर यशस्वी झाला परंतु या बनावट किंगमेकरचा हा बनावट फंडा या परिसरामध्ये आम्ही चालू देणार नाही भूलथापांच्या जोरावरती हा राजकीय डमी फिल्डर लोकांना मूर्ख बनवू शकतो गोरगरीब शेतकऱ्यांना मूर्ख बनवू शकतो पण आमच्यासारख्या सुशिक्षित आणि क्रांतीकारक घराण्यातून येणाऱ्यांना मूर्ख बनवू शकत नाही त्यामुळे याचा बुर्खा आता फाटलेला आहे आणि येत्या नऊ तारखेनंतर याचा बूर्खा आणखी तीव्र तिने फाटेल आणि जनता याला यांची जागा दाखवेल असे पूनम गोळे यांनी बोलताना सांगितले