ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी गोदाम आग प्रकरणी  भिवंडी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर संबंधित आरोपी महिलेला अटक पूर्व जामीन मंजूर..!

ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी गोदाम आग प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर संबंधित आरोपी महिलेला अटक पूर्व जामीन मंजूर..!

July 11, 2025 | महाराष्ट्र, सातारा

प्रतिनिधी सातारा

ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी गोदाम आग प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर संबंधित आरोपी महिलेला अटक पूर्व जामीन मंजूर.

भिवंडी तालुका जिल्हा.ठाणे येथील वळ पाडा या गावी गोदाम मध्ये श्री स्वामी समर्थ वेअर हाऊस मध्ये दि.१४/६/२०२५ अकस्मात आग लागली होती व त्या आगी मध्ये एक व्यक्तीचा होरफळून मृत्यू झाल्या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी वेअरहाऊसचे चालक सौ लक्ष्मी अरविंद सुतार यांनी भिवंडी सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केलां होता सदर अर्जावरती साताताचे कायदे तज्ञ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी न्यायालयामध्ये काम पाहिले व न्यायालयामध्ये काम पाहत असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत जिल्हाधिकारी यांनीच पोलिसांनी कलम चुकवायला लावले असून तो मृत्यू हा निष्काळजी पणा मुळे झाला आहे,मात्र त्यास सदोष मनुष्य वध म्हणता येणार नाही असा मुद्दा न्यायालयासमोर मांडल्याने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा -२००५ कलम ५५ प्रमाणे अश्या दुर्घटना घडू नयेत म्हणून सुरक्षा यंत्रणांचे आयोजन, नियोजन संयोजन व अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले असते तर ती यंत्रणा बसविणे अनिवार्य झाले असते व दुर्घटना घडली नसती, पण तो आदेशच काढला नसल्याने सदर दुर्घटना संदर्भात त्यांनीही जबाबदार का धरू नये व ते आदेश काढले किंवा नाही याचा पोलीसांनी तपास करण्याचा अधिकार आहे व तो त्यांनी केला पाहीजे असे मुद्दे भिवंडी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी मांडले पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणात कलम १०५ लावून, हे प्रकरण अ-जामीन ( नॅान बेलेबल) ठरावे असा हेतू पुरस्सर प्रयत्न केला आहे वस्तुत: सदर घटनेसाठी कलम १०६ हे अधिक योग्य असून ते जामीनपात्र आहे व ते लावले पाहिजे असे अवगत असताना ते लावले नाही, सदरकामी कलम १०५ प्रमाणे गुन्हा घडलेला नसताना, त्या कलमा खाली गुन्हा नोंदविणे आरोपी अटक करून आरोपीस प्रथम वर्ग न्याय दंडाघिकरी यांचे समोर हजर करून,पोलीस कोठडी घेणे ही बाब बेकायदेशीर आहे व तो घटनात्मक हक्काचा भंग ठरणार आहे .पोलिसांनी त्यांचे पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून, जाणीवपूर्वक कठोर कलम लावले आहे, जेणेकरून अर्जदारास जामीन दिला जाऊ नये ही मानसिकता विचारात घेतली पाहीजे.पोलिसांचा हेतुपुरस्सर व अन्यायकारक कलमांचा केलेला वापर लक्षात घेऊन, अर्जदारास अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा तोंडी व लेखी जोरदार युक्तिवाद ॲड विकास बा.पाटील शिरगांवकर यांनी भिवंडी न्यायालयामध्ये सादर केला व तो विचारात घेऊन मेहरबान न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला असल्याने सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विधी मंडळात आग का लागली याचे मुळात जाणे बाबत तारांकित प्रश्न उपस्थित झाला असून त्या पार्श्व भुमीवर मानव निर्मित आग दुर्घटना टाळणारी सुरक्षा यंत्रणा लावण्याचे आदेश प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्या ,२००५ चा आधार घेऊन त्वरित द्यावेत तसेच जनतेनी सुद्धा प्रशासनास सुरक्षिततेच्या योजनेसाठी सहकार्य करावे देशाची संपत्ती वाचवावी असे मत न्यायालयामध्ये ॲड विकास पाटील-शिरगांवकर यांनी मांडले असल्याने ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या युक्तीची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे

Categories: महाराष्ट्र, सातारा

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी ? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?

July 10, 2025

प्रतिनिधी पांचगणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.? दिनांक ९/७/२०२५ रोजी सातारा जिल्हा…

राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.!

July 14, 2025

प्रतिनिधी सातारा राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून…