सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर.
प्रतिनिधी सातारा
सातारा क्लब हा नोंदणाकृत नसताना त्याला हॅाटेलचा परवाना व दारू परवाना दिला गेला हे कागदपत्रे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी समोर आणले आहेत. सातारा क्लब फोरम हा कंपनी कायदा कलम-८ प्रमाणे नोंदणाकृत केलेनंतर तेथे हॅाटेल व दारू विक्रीचा व्यवसाय केला जातो व ते कंपनी कायदा कलम ८ चे विरूध्द आहे याबाबत सुध्दा कंपनी नोंदणी कार्यालय पुणे येथे तक्रार दाखल आहेत व दि २८/४/२०२५ रोजी ॲड विकास पाटील शिरगांवकर हे मानव निर्नित दुर्घटना टाळणे व त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा -२००५ ची अंमलबजावणी ही दुर्घटना घडण्यापेक्षा ती कशी घडू देऊ नये यासाठी केली पाहिजे व ते कलम विचारात घेतले पाहिजे या बाबचा विषय बोलणे कामी मा.जिल्हाधिकारी सातारा यांचे कडे गेले असता,त्या ठिकाणी अवगत कक्षा मध्ये श्री हणमंत किसन फरांदे यांच्या सातारा क्लबचा दारू परवाना रद्द करणे बाबतच्या तक्रारीच्या सुनावणीची तारीख ही २९/४/२०२५ आहे संबंधित टेबलचे कर्मचारी फोन वरून बोलत असताना लक्षात आले वस्तुत: उत्पादन शुल्क खात्याने ती तारीख कळविले नव्हती. सदर तक्रारदार गैरहजर म्हणून निकाली काढली सुध्दा गेली असती मात्र सुनावणीची तारीख ही त्यांचे वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात दि २८/४/२०२५ रोजी ते स्वत: आपत्ती व्यवस्थापन चा विषय बोलणे कामी गेले असता त्या ठिकाणी सातारा क्लबचा विषय व तारूख लक्षात आली.दि.२९/४/२०२५ रोजी दु.१२.३० वा ती सुनावणी सुरू झाली व यदरचा क्लब हा २०२३ पर्यत नोंदणी कृत नसलेली कागदपत्रे व तेयास दिलेला हॉटेल परवाना दारू विक्री परवाना हा गंभार विषय मा जिल्हाधिकारी सो सातारा यांना अवगत केला आहे पुढील सुनावणी ही दि ६/५/२०२५ रोजी नेमली असून या सुनावणी वेळी नक्की काय घडणार आहे हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे.

