राज्यात आगीमुळे घडत असणाऱ्या घटना वेदनादायी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी राज्य शासनाने कडे कोट पणे करावी ॲड विकास पाटील शिरगावकर..!



राज्यात आगीमुळे घडत असणाऱ्या घटना वेदनादायी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी राज्य शासनाने कडे कोट पणे करावी ॲड विकास पाटील शिरगावकर.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

स्वातंत्र्य सैनिक कै. गजानन बंडोजी पाटील (यादव) यांच्या घराचा आदर्श वारसा घेऊन वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्व ॲड विकास पाटील शिरगावकर हे १९९३ साली ठाणे जिल्हात वकिली करू लागले, त्यांनी सातारा कॅा ॲाप क्रेडिट सासायटूचे काम केले सन १९९३ – १९९७ पर्यंत सातारकर ठाणे वासियांना आर्थिक पाठबळ दिले, १९९८ साली त्यांनी यात्रा येथे वकिली सुरू केली, किल्लारी भुकंपा मध्ये ५ दिवस मदत कार्य केले व अमेरिकन संस्थे मार्फत किल्लारी गावा मध्ये शेतकऱ्यांचे घरी चुली मोडल्या, गॅस सिलेंडरचा, शेगडी यांचा वापर माहीत नसणे व त्याचा सरपण तुटवडा,गोळा करणे याचा विचार शेतकरी कुटुंबाना रॅाकेलचे स्टोव्ह देण्यास सल्ला दिला व ते अंमलात आणला ॲड विकास बा. पाटील शिरगांवकर यांनी ,१५ वर्षे सातारा जिल्ह्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले अनेक गाजलेले खटले त्यांनी सरकार पक्षाकडून जिंकले आहेत, उल्हास नगरचे ४ वेळेचा आमदार पप्पू कलानी व डी कंपनीचे ३ शुटर्य यांचे विरूध्द भाजपा चे कार्यकर्ते इंदर सुंदरदास भटीजा यांचे खून प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले वसीम २०१३ साली आजन्म कारावासाची शिक्षा घेतली ती निकाल सर्वोच्च न्यायालयात सन २०१५ साली कायम झाला आहे. सदरचा निकाल हा संगनमत करून जो कट केला व खून करून पुर्ण केला या बद्द्लचा मैलाचा दगड समजला जातो. सदर खटला चालू असताना दि.२२/०१/२००८ रोजी शिरवळ येथे एक अपघात घडला व त्यामध्ये त्यांचे गुरूवर्य ॲड भास्कर कदम यांचा प्राण गेली व ॲड विकास पाटील व नयन राजे भोसले हे गंभीर जखमी झाले मात्र त्यां दोघींनी सिट बेल्ट लावला होता त्यामुळे त्यांचा जीव वाचला. सदर अपघाचा मध्ये ॲड विकास पाटील यांनी डोक्यास व नाकास गंभीर जखम झाल्या मुळे चव व वास ओळखण्याची क्षमता नष्ट झाली, सदर अपघात हा घडविलेला अपघात होता याची चर्चा होत असते अॅड विकास पाटील-शिरगांवकर यांना वास घेण्याची क्षमता नष्ट झाल्या मुळे गॅस गळती ओळखता येणार नाही याचा विचार करून ती गळती आपोआप रोखली गेली राहूदे या कामात स्वतःलाच वाहून घेतले व ते यांनी कऱ्हाड तालुक्यातील वाजेवाडी गे गांव १००% एलपीजी स्फोट सुरक्षित तेले असून त्या कामाची नोंद लिनका बुक नॅशनल रेकॅार्ड म्हणून झाली असून गिनीज ॲाफ वर्ल्ड रेकॅार्ड या संस्थेने त्याची दखल घेतली आहे. संबंधित गावचे शेतकरी यांचा १५ रू कोटी पर्यंतचा विमा गॅसेसेफ या उपकरणामुळे झाला आहे. सदरचा सुरक्षा विषय हा आपेत्ती व्यवस्थापन या बाबत कायदेशीर असून शासनाने त्याची दखल घेऊन एलपीजी मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे, देशाचे पंतप्रधान यांचे कडे त्यांनी पत्र पाठविले आहे व ते सकारात्मक उत्तराची वाट आम्ही पाहत आहोत. मानव निर्मित आपत्ती टाळणारी यंत्रणा लावणे बंधनकारक असून ती शासनाने पारीत केलेल्या कायद्याचे पालन हे प्रशासनाने करणे ही जबाबदारी व कर्तव्य आहे कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५५ हे स्वयंस्पष्ट आहे असे परखड मत ते मांडत असतात. दुर्घटना घडण्या पेक्षा ती घडू न देणे महत्वाचे असून शासनाने यावरती गांभीर्याने विचार केला पाहिजे असे मत जगप्रसिद्ध वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी व्यक्त केले आहे.