पाचगणी परिसरामध्ये राजपुरी टेबल लँड च्या पायथ्याशी पुन्हा हजारो ब्रास उत्खनन करून राजवाडा उभारण्याचे काम सुरू महसूल तहसील प्रशासनातील तलाठी सर्कल तहसीलदार यांची मात्र कारवाईकडे पाठ आता वरिष्ठांन मार्फत कारवाई कधी होणार ? की पुन्हा एकदा धनदांडग्यांना अभय मिळणार.
प्रतिनिधी अनमोल कांबळे
महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने व या महाबळेश्वर तालुक्याला अनाधिकृत बांधकामांचा दिवसांन दिवस विळखा पडत असल्याने याचाच फायदा घेत अनेक अधिकारी सुपाऱ्या घेऊन काही ठराविक अनाधिकृत बांधकामांवरती हातोडा उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे जो पत्रकार जो कार्यकर्ता या अधिकाऱ्यांविरुद्ध बोलेल त्याला वैयक्तिकरित्या टारगेट करून खच्चीकरण करण्याचे काम काही ठराविक राजकीय नेत्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या संगनमताने महाबळेश्वर तालुक्यामध्ये सुरू असल्याचे मागील दिवसांपासून दिसून आले आहे त्यातच आता पाचगणी शहराच्या शेजारी असणाऱ्या राजपुरी गावामध्ये टेबल लँड च्या पायथ्याशी बेकायदेशीर रित्या उत्खनन करून अनाधिकृत राजवाडा उभारल्याचे काम जोमात सुरू असल्याने या राजवाड्याला नक्की अभय कोणाचे आहे? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे, गावाच्या मुख्य रस्त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात टेबल लँड चा पायथा खोदत हजारो ब्रास उत्खनन करत हे भले मोठे अनाधिकृत बांधकाम उभे राहिले आहे परंतु याकडे गाव कामगार तलाठी मंडळ अधिकारी अथवा तालुक्याचे तहसीलदार यांनी पाहिलं सुद्धा नाही ही आश्चर्यचक गोष्ट या तालुक्यांमध्ये घडली असल्याचे पाहायला मिळत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावरती अनाधिकृत राजवाडा उभा राहतो टेबल लँड चा पायथा खोदला जातो तरीसुद्धा वनविभाग महसूल विभाग यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले असल्याने या राजवाड्याला नक्की अभय आहे तरी कुणाचं? असा असणारा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर व या प्रश्नाची माहिती स्थानिकांकडून घेतल्यानंतर कळते की एका बड्या धनदांड्याचे हे अनधिकृत बांधकाम असून या बांधकामाची मलई मात्र काही अधिकाऱ्यांनी सुद्धा खाली असल्याची चर्चा संपूर्ण पाचगणी परिसरात जोरात सुरू आहे मात्र मलय खाल्ल्याची चर्चा सुरू असतानाच या अनाधिकृत बांधकामावरती आता महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार? की पुन्हा एकदा या बांधकामाला अभय मिळणार? हजारो ब्रास केलेले उत्खनन किरकोळ पंचनाम्यात गुंडाळले जाणार ? की मोठ्या प्रमाणात कारवाई होणार ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

