शिक्षिका अत्याचार प्रकरणी आरोपी असणाऱ्या PI सतीश पवार याची कार पाचगणी पोलीस पार्किंग मध्ये आलिशान थाटात उभी इतर आरोपींच्या गाड्या मात्र कडकडीत उन्हात धुळ खात.



प्रतिनिधी अनमोल कांबळे

शिक्षिका अत्याचार प्रकरणी आरोपी असणाऱ्या PI सतीश पवार याची कार पाचगणी पोलीस पार्किंग मध्ये आलिशान थाटात उभी इतर आरोपींच्या गाड्या मात्र कडकडीत उन्हात धुळ खात.

महाराष्ट्रभर गाजत असणाऱ्या शिक्षिका अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या पाचगणीतील तत्कालीन PI सतीश पवार हे वापरत असणारी चार चाकी गाडी पाचगणी पोलीस स्टेशनच्या पार्किंग मध्ये थाटात उभी असल्याने पाचगणी शहरातील लोकांन मध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे, 2019 साली पाचगणी येथे उद्योगपती वादवांन नावाच्या काही लोकांवरती पाचगणी पोलीस स्टेशन मार्फत कारवाई केली गेली होती मात्र त्यांच्या सह इतर गुन्ह्यातील आरोपींच्या मालकीच्या असणाऱ्या करोडो रुपयांच्या गाड्या आजही पाचगणी पोलीस स्टेशन परिसरामध्ये कडकत्या उन्हात सडत असण्याचे दृश्य दिसून आले आहे, मात्र महिला शिक्षिका अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या व पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असणाऱ्या PI सतीश पवार यांना नक्की पोलीस खात्यातील अशा कुठल्या बड्या अधिकाऱ्याचे अभय आहे की बलात्कारातील एपीआय आरोपी असताना देखील आरोपीची गाडी मात्र पाचगणी पोलीस स्टेशनच्या मालकीच्या असणाऱ्या पार्किंग मध्ये आलिशान थाटात उभी आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे, इतर आरोपींच्या गाड्या या ग्राउंड मध्ये उभ्या केल्या जातात मग सतीश पवार पोलिसांच्या इतक्या जवळचा आरोपी आहे का? की त्याची गाडी पोलीस गाड्यांच्या सोबत उभी केली जात आहे, हा असणारा प्रश्न पाचगणी करांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख हे सतीश पवार यांना अभय देणाऱ्या त्यांना सांभाळून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? की पुन्हा एकदा आरोपी पोलीस असल्याने खाकी वर्दीतला आरोपी असल्याने त्याला अभय मिळणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे‌.