माझ्यावरती द्वेषापोटी तहसीलदारांनी कारवाई केली माझा काटा काढण्याचा प्रयत्न हा सहा महिन्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना याची सर्व कल्पना सहा महिन्यापूर्वीच पत्राद्वारे देऊन ठेवली आहे तशाच प्रकारे कारवाई आज माझ्या वरती करण्यात आली आहे मला न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर मरेपर्यंत उपोषण करीन अनमोल कांबळे.



प्रतिनिधी पांचगणी

माझ्यावरती द्वेषापोटी तहसीलदारांनी कारवाई केली माझा काटा काढण्याचा प्रयत्न हा सहा महिन्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना याची सर्व कल्पना सहा महिन्यापूर्वीच पत्राद्वारे देऊन ठेवली आहे तशाच प्रकारे कारवाई आज माझ्या वरती करण्यात आली आहे मला न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर मरेपर्यंत उपोषण करीन अनमोल कांबळे.

पांचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 533/NA/ प्रॉपर्टी मध्ये भिंत पावसाळ्यामध्ये वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण भिंत नव्या रूपाने बांधण्यात येत आहे, व त्या अनुषंगाने तेथील बाजूस वाहून गेलेली माती पावसामध्ये शासनाच्या वतीने गोळा करून ठेवली होती व ती माती ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात आलेल्या भिंतीला भर टाकण्याकरिता तिचा वापर केला जात होता, परंतु नवनिर्वाचित तलाठी शिंदे यांनी अचानक रित्या माझ्याकडे व मूळ मालकाकडे पैशाची मागणी केल्याने व त्या संदर्भात मी पैसे देणार नाही असे मी नाकारल्यामुळेच रात्री अपरात्री तहसीलदार यांच्यासोबत माझ्यावरती प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये कंपाऊंडच्या वरून उड्या मारून प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये उभा असणारा जेसीबी व ट्रॅक्टर हा तहसीलदार यांच्या माध्यमातून सील करण्यात आलेला आहे, व त्याच बरोबर या विषयाची वाचता कुठे केल्यास तुझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे मला समजते, परंतु मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक दृष्टीचा कार्यकर्ता असल्याने माझा संविधानावरती पूर्ण विश्वास आहे, त्या अनुषंगाने मी सहा महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी सातारा व पोलीस अधीक्षक सो सातारा यांच्याकडे माझी तक्रार दाखल केली होती त्याच तक्रारी अर्ज सोबत आज तक्रार दाखल करायला पाचगणी पोलीस स्टेशन मी गेलो असता माझी तक्रार पाचगणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करून घेतली नाही व त्या अनुषंगाने माझी जी काही तक्रार आहे, ती मी पोलीस अधीक्षक सातारा एसपी ऑफिस यांना मेलद्वारे पाठवून दिली आहे मला विश्वास आहे माझ्यावरती जातीय द्वेष बाळगून केलेली कारवाई ही पूर्णपणे खोटी व बोगस आहे, व मी दिनांक 27/6/2024/ रोजी जिल्हाधिकारी सातारा व पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारी वरती आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही परंतु त्या तक्रारीच्या अनुषंगाने लवकरच कारवाई करण्यात येईल व माझा जबाब देखील घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसे न झाल्यास येत्या 26/जानेवारी च्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्याच्या निवासस्थानाबाहेर मरेपर्यंत उपोषण करणार असून जोपर्यंत मला व माझ्या कुटुंबातील लोकांचा मानसिक छळ करणाऱ्यांना शासन होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या हातून मरण्यापेक्षा स्व इच्छेने मुख्यमंत्र्यांच्या दारात मरणे पत्करीन असे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे