हास्य निर्माता भाऊ कदम यांची वावगिरी 6 डिसेंबर नंतर बाहेर काढू अनमोल कांबळे…!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

हास्य निर्माता भाऊ कदम यांची वावगिरी 6 डिसेंबर नंतर बाहेर काढू अनमोल कांबळे.

महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला हसवणाऱ्या व एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या ॲक्टर भाऊ कदम यांनी महाराष्ट्रातील एका विशिष्ट पक्षाचा आधार घेत महाबळेश्वर पाचगणी या शहरांमध्ये पर्यावरणाचा घात करत, पर्यावरणाच्या झाडांची हत्या केलेली आहे, असे अनमोल कांबळे म्हणाले इतकच नाही तर भाऊ कदम यांचा एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याकारणाने त्यांच्यावरती कारवाई करत असताना अधिकाऱ्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील वरिष्ठ नेत्यांच्या फोनची वर्णी लागत असावी? म्हणून की काय हास्य निर्माते ॲक्टर भाऊ कदम यांच्यावरती सातारा जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलला जात नाही व कारवाई देखील केली जात नाही म्हणूनच हा क्रांतिकारक लढा आम्ही हातामध्ये घेऊ व महाराष्ट्रातील हास्य निर्माते असणाऱ्या एका विशिष्ट पक्षाशी संबंध असणाऱ्या ऍक्टर भाऊ कदम यांना संविधानिक दृष्ट्या कायद्याच्या माध्यमातून शिक्षा कशी भेटेल याचा पाठपुरावा करू शेतकऱ्याला एक न्याय सर्वसामान्याला एक न्याय वंचिताला एक न्याय आणि श्रीमंतांची चोचले पुरवणाऱ्या हास्य निर्माते असणाऱ्यांना एक न्याय देण्याचे धोरण या सरकारने ठरवलं आहे का? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणार आहे का? हे या नवनिर्वाचित सरकारने जाहीर करावे, बॉम्ब ब्लास्ट मध्ये निर्दोष सुटणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती येल्लो झोन मध्ये हॉटेल आहे, तरी देखील वरचा फ्लोर पत्रा शेडचा उभारला म्हणून कारवाई केली जाते हॉटेल सील केले जात परंतु ग्रीन झोन मध्ये अक्षरशः पर्यावरणाच्या झाडांच्या पोटात खंजीर खूपसणाऱ्या लोकांवरती कारवाई केली जात नाही हा द्वेष कुणासाठी व कशासाठी आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावरती चालतो या देशात कायदा नावाची गोष्ट आहे, या देशात संविधान आहे आणि म्हणून संविधान जिवंत ठेवायचे असेल कायदा जिवंत ठेवायचा असेल तर अशा धनदांडग्या वृत्तीला शिक्षा देणे गरजेचे आहे, व ती आम्ही कायद्याच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून 6 डिसेंबर नंतर नक्कीच देण्याचा प्रयत्न करू असे अनमोल कांबळे यांनी सांगितले….