प्रतिनिधी अनमोल कांबळे
भिलार येथे कार्यरत असणाऱ्या पवार नावाच्या तलाठ्याच्या टक्केवारीची आकडेवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती तलाठ्यांच्या चिरंजीवांच्या लँड डेव्हलपिंग कंपनीचा नक्की रोल काय ?कपूर नावाच्या व्यक्तीला नोटीस न काढता बनावट दस्त पवार तलाठ्यांनी कसा काय नोंदवला?
मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर तालुक्यामध्ये नेहमी वादग्रस्त विषयांमध्ये चर्चेत असणारे एस के पवार नावाच्या तलाठ्याने आता मात्र कहरच केला असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे या अगोदर देखील प्रतापगड भागामध्ये कार्यरत असताना वनसंदृश्य क्षेत्राचा दस्त एस के पवार यांच्या मुलाच्या नावे असणाऱ्या लँड डेव्हलपिंग कंपनीने केला होता त्याचीच पुनरावृत्ती करत असताना आता चक्क आगवणे इस्मानी कपूर नावाची एक महिला तयार करून काही दिवसांपूर्वी बनावट दस्त तयार केला होता व तो दस्त नोंदवण्याकरिता एस के पवार तलाठी भिलार व मंडळ अधिकारी मुळीक पाचगणी नावाच्या अधिकाऱ्यांकडे बनावट दस्त तयार करणाऱ्या लँड माफिया एजंट यांनी काही दिवसापूर्वी सुपूर्त केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, व त्या अनुषंगाने पवार तलाठी व मंडल अधिकारी पाचगणी मुळीक यांनी संबंधित कपूर नावाच्या महिलेला कुठलेही नोटीस न बजावता व पंधरा दिवस वाट न पाहता चक्क बनावट दस्त करणाऱ्यांची नोंदच शासकीय दप्तरी दाखल केल्याची धक्कादायक गोष्ट भिलार येथे घडली आहे, ही घटना घडल्यानंतर संबंधित जागा मालक कपूर या ठिकाणी उपस्थित झाल्या नंतर हा सर्व बनावट दस्त प्रकार समोर आला आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनामध्ये काल दिनांक 22/10/2024/ रोजी मंडल अधिकारी पाचगणी व गाव कामगार तलाठी भिलार यांची सुनावणी देखील पार पडली असल्याचे समजत आहे, व त्या अनुषंगाने संपूर्ण विषयाचा तपास पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे स्वतः करत असल्याने व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे काम पाहता संबंधित महिलेला न्याय मिळेल अशा आशियाची अपेक्षा पाचगणी भिलार परिसरातून नागरिकांच्या माध्यमातून सांगितले जात आहे, परंतु नेहमीच वादग्रस्त असणारे तलाठी एस के पवार व नुकतेच रुजू झालेले मंडल अधिकारी मुळीक यांच्यावरती तहसीलदार महाबळेश्वर व उपविभागीय प्रांताधिकारी वाई बनावट दस्त शासकीय दप्तरी नोंदवल्याप्रकरणी काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे, पुढील भागात

