पांचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार गडगंज संजय मोरे च्या हस्तकांकडून निकृष्ट दर्जाचे काम पाचगणी करांच्या माथे मात्र क्रशन ग्रिट पावडर चा मारा.



प्रतिनिधी पांचगणी

पाचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार गडगंज संजय मोरे च्या हस्तकांकडून निकृष्ट दर्जाचे काम पाचगणी करांच्या माथे मात्र क्रशन ग्रिट पावडर चा मारा.

पाचगणी येथील एसटी बस स्टॉप येथे चांगल्या दर्जाचा रोड असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाचगणी येथील एसटी महामंडळ बस स्टॉप आतील बाजूस काँक्रिटीकरण रोड करण्याकरिता मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे व रोडचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हे सध्या परिस्थितीत चालू होणार आहे असे लोकांना सांगून पाचगणी येथील एसटी बस स्टॉप चा चांगल्या दर्जाचा रोड खोदून त्या खोदलेल्या जागेवरती क्रशन ग्रिटचा व खडीचा मारा करत पाचगणी करांच्या माथे मात्र डबर ग्रिट व क्रशन पावडर चे हलक्या दर्जाचे काँक्रिटीकरणाचे रोड देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नावावरती महाबळेश्वर तालुक्यामध्ये वाईतील रात्रीच्या अंधारात क्रशन ग्रिट व डबर च्या खाणी चालवणार्या गावगुंड घेऊन दहशत माजवणाऱ्या संजय मोरे यांच्या च्या वतीने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे, सध्या परिस्थितीत कागदोपत्री एक ठेकेदार मात्र स्पोर्ट वरती संजय मोरे हा असणारा प्रकार मोठ्या प्रमाणात पाचगणी महाबळेश्वर मध्ये शासनाच्या कामांवरती सुरू असल्याचे दिसून येत आहे, संजय मोरे कोण आहे,? असा प्रश्न पाचगणी करांनी विचारताच लोकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत संजय मोरे हे महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी गाव विक्री मधील एजंट असल्याचे समजत आहे व अशी चर्चा देखील चालू आहे पूर्वी संजय मोरे हे आमदार गटाकडे होते परंतु आमदार यांना संजय मोरे यांचा प्रकार कळताच आमदार यांनी त्यांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे काम केले होते परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच ते लगेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षांमध्ये प्रवेश करत शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचे काम त्यांनी केले परंतु एकनाथ शिंदे यांचा पक्ष तालुक्यामध्ये वाढवण्या ऐवजी सक्रियतेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणे कोट्रोशी रेनोशी या दुर्गम भागामध्ये शासनाच्या वतीने मंजूर केलेली कामे हे विविध लोकांच्या नावावरती घेऊन ती कामे स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करणे त्याच प्रकारे रेणोशी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करून डबर व खडीच्या खाणी रात्रीच्या अंधारात चालवणे दुर्गम भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नाव वापरून दहशत माजवण्याचे काम संजय मोरे करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे, मात्र संजय मोरे वारंवार मुख्यमंत्र्यांचे नाव वापरत असल्याने व मुख्यमंत्र्यांसोबत फोटो फिरवत असल्याने प्रशासन देखील संजय मोरे यांच्या वरती कारवाई करण्यास दचकत आहे की काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित झाला असल्याने मे खडा तो सरकार से बडा म्हणत संजय मोरे यांनी आपले डोके आता पाचगणी भिलार व परिसरामध्ये काढायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे, पाचगणी येथील एसटी बस स्टॉप च्या संपूर्ण कामाच्या दर्जाची तक्रारदाराला घेऊन खातीनिहाय चौकशी होणार का? पाचगणी करांच्या माथे मारलेल्या क्रशन ग्रिट पावडर कोटिंगच्या कामाच्या रोडची टेस्टिंग होणार का? मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाचगणी करांच्या माथे ग्रिट क्रशन पावडर चा मारा भेटणार ? की चांगल्या दर्जाचे काम होणार हे बघन आता गांभीर्याचे ठरणार आहे.