मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरती कांदाटीखोऱ्यात दहशत वाजवणाऱ्या संजय मोरेचा शिरकाव आता पाचगणी शहरामध्ये संजय मोरेची भाईगिरी पाचगणी मध्ये खपवून घेणार नाही अनमोल कांबळे.
August 22, 2024 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरती कांदाटीखोऱ्यात दहशत वाजवणाऱ्या संजय मोरेचा शिरकाव आता पाचगणी शहरामध्ये संजय मोरेची भाईगिरी पाचगणी मध्ये खपवून घेणार नाही अनमोल कांबळे
पांचगणी एसटी महामंडळा च्या विकास आराखड्याच्या माध्यमातून पाचगणी शहरातील एसटी महामंडळाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम हे एका ठेकेदाराने घेतले असून त्यामध्ये कोयना खोऱ्यातील लोकांच्या जमिनी हडपणारा व झाडनी प्रकरणात एजंट म्हणून संशयित अशी ओळख असणाऱ्या संजय मोरे याने आता पाचगणी मध्ये शिरकाव करत वाईतील काही गुंड हाताशी धरत पाचगणी शहरांमध्ये खान माफियांच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारात शहरामध्ये दहशत वाजवण्याचे काम सुरू केले आहे रात्रीच्या अंधारामध्ये पाच-सहा ब्रास चे डंपर भरून सर्रास रस्त्यावरती कुठलीही शासकीय पावती नसताना फिरत आहेत परंतु महसूल विभाग याकडे डोळेझाकपणा करत असल्याचे दिसून येत आहे वाईतील गावगुंड आणून रस्त्यावरती डबर व ग्रिट च्या ढिकार्यांवरती बसवून मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली दहशत माजवण्याचा प्रयत्न संजय मोरे हे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत असे सांगून संजय मोरेची ही मुले करत आहेत व संजय मोरे महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील खूप मोठा भाई आहे असे सांगण्याचे काम हे वाईतील गावगुंड करत असल्याची चर्चा संपूर्ण पाचगणी शहरांमध्ये उभारीस आली असून हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा संजय मोरे नक्की कोण ही चर्चा सर्वत्र वाऱ्यागत पसरली असून संजय मोरे हा एक लँड माफी आहे गोरगरीब कष्टकऱ्यांना फसवून जागा हडपण हा त्याचा व्यवसाय आहे व तो पूर्वी आमदार गटा सोबत होता परंतु जसे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले की पुन्हा या गिरगिटने त्याचा रंग बदलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे व आता मुख्यमंत्र्यांचे नाव वापरत आता याने त्याची दहशत पाचगणी शहरापर्यंत आणून ठेवली आहे परंतु संजय मोरे या गावगुंडांची दहशत पाचगणी शहरामध्ये अजिबात खपवून घेतली जाणार नाही रस्त्याचे काँक्रिटीकरण चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे परंतु चांगल्या दर्जाचे न होता निकृष्ट दर्जाचे होईल ही आमची खात्री आहे संजय मोरे ने काँक्रिटीकरण करण्याकरिता जो माल आणला आहे त्याच्या पावत्या संजय मोरे कडे आहेत का? त्याचे उत्तर एसटी महामंडळ व्यवस्थापनाने अथवा बांधकाम विभागाने आम्हाला द्यावे संजय मोरे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावरती या ठिकाणी सुद्धा दहशत वाजवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ठेका नक्की घेतला कुणी आहे व कामाची पद्धत काय आहे याच्या विषयी लवकरच माहिती घेऊन संजय मोरे यांनी मनमानी कारभाराने माजवलेल्या दहशती विरोधात आंदोलन करणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले कारण मुख्यमंत्री हे सर्वांचे आहेत संजय मोरे च्या सांगण्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या जवळ संजय मोरे नाही संजय मोरे हा एक एजंट आहे आणि एजंटाची पात्रता काय असती हे आम्ही लोकांना सांगू शकत नाही त्यांना माहित आहे हा तोच संजय मोरे आहे ज्याच्या सांगण्यावरून वाईतील त्याच्या गावगुंडांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या तोंडाला काळे फासू असे सांगितले होते व या गुंडाच्या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता लवकरच संजय मोरेच्या दहशती विरोधात पाचगणी शहरांमध्ये आंदोलन करणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले
Categories: महाबळेश्वर
Related Posts
खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश.
August 22, 2024
प्रतिनिधी शिरवळ खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश…. खंडाळा…
पांचगणी येथील सर्वे नंबर १२८/मधील पाकिस्तान प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनाची धावाधाव तहसीलदारांचा निकाल लागायच्या अगोदरच प्रशासनाच भाकीत संस्थाचालकांचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा सीबीआय अथवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाकडून या प्रकरणाची चौकशी होणार की नाही? याकडे जिल्ह्याचे लक्ष.
August 27, 2024
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी येथील सर्वे नंबर १२८/मधील पाकिस्तान प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनाची धावाधाव तहसीलदारांचा निकाल लागायच्या अगोदरच प्रशासनाच भाकीत संस्थाचालकांचा पाकिस्तानशी…
