एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

March 17, 2022 | सातारा

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. विधानसभेत आज (ता. १५ मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुम्ही ती २५ आमदारांची यादी मला द्या; सरकार कसे करायाचे, हे मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत खळबळ उडवून दिली. मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेल्या या मागणीने भाजपच्या सरकार स्थापनेबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. (Give a list of 25 MLA, I will tell you how to form a government : Sudhir Mungantiwar)

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर चौफेर टीका केली. त्याचवेळी बोलताना मुनगंटीवार हे एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, ‘एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी माझ्याकडे द्या. सरकार कसे बनवायचे, हे मी तुम्हाला सांगतो’ असे सांगत सरकार बनविण्याबाबत पुन्हा सूतोवाच केले.

हा अर्थसंकल्प ‘कट पेस्ट बजेट’ आहे. मागील अर्थसंकल्पातील योजना पुन्हा वाचून दाखवल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाने गाईगोठा योजना सुरू केली. त्याला निधी दिला. मात्र, सावित्रीबाई फुले आणि (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फक्त योजनांची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला.

Categories: सातारा

Related Posts

‘आम आदमी’चा ‘ग्रँड’ शपथविधी सोहळा; १५० एकरांवरील गहू भुईसपाट

March 15, 2022

अमृतसर : पंजाब (Punjab) विधानसभेत काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) ९२ जागा जिंकत एकहाती आणि ऐतिहासिक…

स्वाभिमानी करतेय महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्याची तयारी…

March 17, 2022

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Farmers Association) आता सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळून निघालेले आहेत. त्यामुळे या…